एकुंडी येथे बसवेश्वर, यल्लम्मा, दुर्गादेवी देवस्थान ट्रस्टचे उदघाटन संपन्न.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- तालुक्यातील एकुंडी येथील ग्रामदैवत श्री बसवेश्वर देवस्थान ट्रस्ट, श्री दुर्गादेवी देवस्थान ट्रस्ट व श्री यलम्मादेवी देवस्थान ट्रस्टच्या नामफलकाचे उदघाटन जत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.
नुकतेच या तिन्ही देवस्थानला धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून नोंदणी परवाना मिळाल्याने एकुंडी येथील भक्तगणांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात उदघाटन समारंभ पार पडला. मंदिर परिसर विकासासाठी एकुंडी येथील सर्व भक्तांनी मिळून या ट्रस्टची निर्मिती केले असल्याचे येथील ट्रस्टींनी सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड म्हणाले की, एकुंडी गाव शांत व समृद्ध गाव असून या नुतन स्थापित देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून भक्त मंडळींनी देवस्थान परिसराचा व गावाचा विकास करावा.
यावेळी एकुंडी गावातील जेष्ठ नागरिकांसह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

13 मे हा दिवस संत निरंकारी मिशनच्या वतीने जगभर “समर्पण दिवस” म्हणून साजरा केला जातो.

कोळगिरी येथे मतदार जनजागृती अभियान अंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन.