बसरगी येथील बामणे कुटूंबाचा सर्व ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार संपन्न.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले बसरगी येथील नागेश बामणे आणि अद्वीता बामणे या पती पत्नी यांचे स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने १५ ऑगस्ट या शुभदिनी नागरी सत्कार संपन्न झाला. नागेश बामणे यांची निवड कक्ष अधिकारी मंत्रालय महाराष्ट्र शासन, आणि अद्वीता बामणे यांची पोलिस उप अधिक्षक पदी निवड झाली आहे.
बसरगी गावात १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी प्रत्येक वर्षी गावातील सर्व शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ एकत्र येऊन विविध कलागुण दर्शन आणि भाषणाचे कार्यक्रम होतात. परंपरे प्रमाणे या वर्षी सुद्धा एकत्र येऊन आपल्या गावच्या सुपुत्राचे आणि त्यांच्या पत्नीचे अभिनंदन केले त्याचवेळी गावातील विविध संस्था, मंडळे आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी देखील त्यांचा विशेष सत्कार केला. याप्रसंगी नागेश बामणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी आपला शाळेपासून ते आजपर्यंतचा प्रवास याबद्दल आपले अनुभव व  पती पत्नी दोघांनी आपली नोकरी आणि संसार  सांभाळत कसे यश मिळवले हे  सांगितले तसेच सर्व मुलांना भविष्याबद्दल करीयर मार्गदर्शन देखील केले आणि मुलांच्या मनामध्ये स्पर्धा परीक्षेबाबत प्रेरणा निर्माण केली.
त्यांनी आपल्या गावातील मुलांच्या साठी एक अभ्यास केंद्र सुरू करून भविष्यामध्ये असेच अजून अधिकारी, उद्योजक आणि विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करणारी पिढी निर्माण करणार असल्याची इच्छा व्यक्त केली.
या कार्यक्रम प्रसंगी सरपंच श्री शिवाप्पा तावंशी, सोसायटी चेअरमन श्री चंद्रकांत बामणे, मा.उपसरपंच श्री किशोर बामणे, मराठी शाळेचे अध्यक्ष श्री पिरगोंडा बिरादार, संगय्या स्वामी, ग्रामपंचायत चे आजी - माजी सदस्य, सोसायटीचे आजी - माजी संचालक, ग्रामसेवक श्री. राजेश ननावरे, सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक,व शासकीय अधिकारी व कर्मचारी ,ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन