जत येथे तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा सुरू.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- सन 2023 - 24 या शैक्षणिक वर्षातील शालेय कुस्ती स्पर्धा सोमवार दिनांक 4 सप्टेंबर 2023  रोजी 14 , 17, 19 वर्ष मुले व मुली यांच्या फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धा होतील व मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी 14 , 17 , 19  वर्ष मुलांचे ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धा संपन्न होणार आहे तरी या कुस्ती स्पर्धेच्या उदघाटनसाठी प्रमुख पाहुणे म्हणून जत विधानसभा मतदार संघाचे  आमदार विक्रमसिंह दादा सावंत उपस्तीत राहणार आहेत त्याच बरोबर पोलीस उपविभागीय अधिकारी  सुनील साळुंखे साहेब उपस्तीत राहणार आहेत  त्याचबरोबर दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन डॉ मनोहर मोदींसाहेब व मुख्याध्यापक सोलापुरे सर व क्रीडामार्गदर्शक विजय बिराजदार , परवेज गडीकर  व जत तालुका क्रीडा  शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शेख सर उपस्तीत राहणार आहेत तर या स्पर्धेचे संयोजक पै प्रांजल सावंत कुस्ती केंद्र जतचे पैलवान पांडुरंग सावंत यांनी या स्पर्धेचे नियोजन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन