गणपती माझा नाचत आला या गाण्याचे जत येथे थाटामाटात लाँचिंग सोहळा संपन्न-के.अजितकुमार.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत :-  सांगली जिल्ह्यातील जत मध्ये उमा नर्सिग काॅलेज येथे जत तालुक्यातील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सदस्य दिनकर पतंगे यांच्या वाढदिवसानिमित्त गणपती माझा नाचत आला या गाण्याचे पोस्टर लाँचिंग पतंगे साहेबाच्या शुभहस्ते करण्यात आले.जत तालुका सदैव दुष्काळी त्रासाने ग्रासले असून तरी येथील स्थानिक कलाकार उतुंग असे कला सादरीकरण करीत असतात.या वर्षी पाऊसाने हजेरी न लावल्याने संपूर्ण महाराष्टामध्ये शेतकर्यांची उदासिनता दिसून येते.याच गीतातून सर्व बाप्पाकडे क्षमा यातना मागून दुष्काळाच्या गडद छायेतून सुंदर अशी हिरवाईने नटलेली शेती डोळ्यासमोर दिसावी हिच बाप्पाच्या चरणी या गीतातून प्रकट अशी इच्छाशक्ती जागृत व्हावी या गीतातून मांडलेली आहे.अनेक मान्यवराच्या उपस्थितीत या गाण्याचे लाँचिग सोहळा ताटामाटात पार पडले.या गाण्याची प्रस्तुती कृणाल प्रोडक्शन हाऊस व आर बी अॅडिओ असून संपूर्ण गाण्याची निर्मिती उद्यनमुख गायक संगीतकार रवि बिळूर यांनी उचलले असून गणपती माझा नाचत आला अविट असे गाणे गायले असून त्यांनी स्वःता उत्तम असे संगीत दिलेल आहे.या गाण्याचे बोल के अजितकुमार यांनी लिहलेले असून या गाण्याचे ध्वनिमुद्रण पी एन एम स्टुडीओ बेंगलूर येथे झाले आहे.साऊंड इंजनियर चेतन, रिदम कुट्टी सर,या गाण्याचे एडिंटीग नागराज जी हर्शूर यांच्या नंदी फिल्म स्टुडीओ बेंगलूर येथे झाले या गाण्याचे संगीत संयोजन प्रविण निकेतन यांनी केले असून गणपती माझा नाचत आला या गाण्याचे सहाय्यक म्हणून अनेक मराठी कन्नड चित्रपटात काम केलेले कलाकार राजेंद्र आरळी,कलाकार एम जगदिश,  कलाकार राजू सावंत,पैंगबर ह्याळकरयांनी भुमिका बजावली. या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली यात लायन्स क्लब अध्यक्ष सुभाष शिंदे सर,विद्याधर किट्टद सर,शिवकांत मोगली,शांतीलाल ओसवाल,दराडे सर,जेष्ठ नागरिक संगटना अधयक्ष यशवंतराव चव्हाण साहेब,शफीक इनामदार,श्रीकांत सोनवणे,अब्बास मुजावर, आप्पासाहेब चौगुले,योगा परिवार यासह मेडीकल काॅलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.या मान्यवरांनी सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या.गणपती माझा नाचत आला आर बी अँडीओ या युटुब चॅनेलवरती प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे,नक्कीच हे गाणे संपूर्ण महाराष्टात धुमाकूळ घालेलं अशी अशा आहे.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन