एक गाव एक गणपती संकल्प राबवणार्या गावास तुकारामबाबा महाराज यांनी केले ३९ गणेश मूर्तीची वाटप.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत-ः जत तालुक्यात 'एक गाव, एक गणपती' ही संकल्पना राबविल्या जाणाऱ्या गावातील गणेश मंडळाना चिकलगी भुयार मठ (ता मंगळवेढा) येथील श्रीसंत बागडे बाबा मठाचे मठाधिपती,पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष तुकारामबाबा महाराज,शिवाजी वाटबंरे महाराज यांच्या हस्ते ३९ गणेश मूर्ती वाटप केले.हा कार्यक्रम संख (ता जत) येथे झाला.या उपक्रमाला गणेश मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला.
वैराग्य संपन्न श्रीसंत सदगुरु बागडेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त गणेश मंडळांना मोफत गणेश मूर्तीची वाटप एक गाव एक गणपती एक अनोखा उपक्रम अंर्तगत मंडळाना ३९ गणेश मूर्तीचे वाटप करण्यात आले.गणेश मूर्ती वाटपाचे १३ वे वर्षे आहे.
संख येथील बागडेबाबा गुड्डापूर रोड येथे ३४ गणेश मूर्ती व चिकलगी भुयार मठ येथे ५ गणेश मूर्तीचे वाटप केले.
राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे परमशिष्य श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या २९ व्या पुण्यतिथीनिमित्य चिक्कलगी (ता.मंगळवेढा) येथील भुयार मठात २१ सप्टेंबर स.९ ते ११ श्री भागवताचार्य शिवाजी महाराज, वाटंबेरे यांचे काल्याचे किर्तन व दुपारी १२.३० वाजता फुले व गुलाल टाकून कार्यक्रमाची सांगता करण्यात होणार आहे.
यावेळी ह.भ.प तुकाराम महाराज म्हणाले, गणेश मंडळांना व तरुण पिढीला एक दिलासा म्हणून एक गाव एक गणपती उपक्रम गणेश मंडळांना श्रीसंत बागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या वत्तीने गणपती विर्सजन दिवशी अपघाताचे प्रमाण लक्षात घेऊन मंडळांना हेल्मट देण्याचा एक अनोखा उपक्रम राबविणार आहे.दुष्काळावर दोन हात करण्याची ताकद द्यावी. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने करावा.सामाजिक बांधलिकी जपण्याचे गणपतीचे चरणी साकड घातले आहे.
सामाजिक बांधलिकी :-
देहू-आळंदीचे भाग्वतचार्य शिवाजी वाटबंरे महाराज म्हणाले, " तुकाराम महाराज जनसामान्यांच्या सुखदुःख जाणून समस्या घेऊन लढत आहेत.इतर महाराज पेक्षा त्यांचे काम वेगळे आहे.दुष्काळी व सामाजिक काम आदर्शवादी आहे.सामाजिक कामामधून सामाजिक बांधलिकी जपली आहे."
Comments
Post a Comment