14 वर्ष वयोगट मूला- मुलींच्या सांगली जिल्हा स्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा व निवडचाचणी.

दिव्यराज न्युज जत :- महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने 14 वर्ष वयोगट मुला- मुलींच्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा - कोपरगाव अहमदनगर  या ठिकाणी संपन्न होणार आहेत सदर स्पर्धेसाठी सांगली जिल्हा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सहभाग होणार असून रविवार दिनांक  29 ऑक्टोम्बर  2023 रोजी सकाळी -  09 .00 वाजता तालुका क्रीडा संकुल जत ता - जत जि - सांगली   येथे निवड चाचणी व स्पर्धा आयोजित केले आहे तरी या निवड चाचणीसाठी जास्तीत जास्त खेळाडू सहभागी व्हावे व निवड चाचणीसाटी येताना -  संपूर्ण माहिती भरलेला फॉर्म, दोन पोटो, आधारकार्ड झेरॉक्स , शाळेचा बोनाफाईड  घेऊन यावे व खेळाडूंचे जन्म तारीख 01/ 01/ 2010 च्या नंतरचे असणे आवश्यक आहे .अशी माहिती पत्रकार परिषदेत सांगली जिल्हा टेनिस क्रीकेट असोसिएशनचे सचिव - विजय बिराजदार यांनी सांगितले यावेळी सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे  अध्यक्ष - आमदार विक्रमसिंहदादा सावंत, कार्याध्यक्ष - परवेज गडीकर , उपाध्यक्ष -  अझहरुद्दीन शेख , खजिनदार - स्वप्नील सुर्वे व सदस्य महंमदहुसेन शेख , यश सावंत व   संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्तीत होते. अधिक माहितीसाठी सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव- विजय बिराजदार सर ( मो - 7745019792 ) यांच्याशी संपर्क साधावे,

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

13 मे हा दिवस संत निरंकारी मिशनच्या वतीने जगभर “समर्पण दिवस” म्हणून साजरा केला जातो.

जत येथील सोहन ठोंबरे यांना डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची पीएच. डी.