स्वच्छता ही सेवा 2023" अभियान अंतर्गत रामपुर येथे श्रमदान मोहीम उत्साहात संपन्न.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- जिल्हा परिषद सांगलीच्या मा मुख्यकार्यकारी अधिकारी सौ तृप्ती धोडमिसे मँडम यांचे सुचनेनुसार तसेच शासन परिपत्रकानुसार स्वच्छ भारत अभियान अंतर्गत"स्वच्छता ही सेवा२०२३"या निमित्ताने दिनांक १५ सप्टेंबर ते २ आँक्टोबर २०२३ या कालावधीत कचरा मुक्त भारत या थीम नुसार आपण १५ सप्टेंबर पासुन प्रत्येक दिवशी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गृह भेटी, श्रमदान,स्वच्छता संवाद, शालेय विद्यार्थी स्वच्छता विषयक घोषवाक्य व चित्रकला स्पर्धा,कविता स्पर्धा,ग्रामपंचायत पातळीवर स्वच्छता दौड,स्वच्छता क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मच्याऱ्याचा सत्कार,पर्यटन धार्मिक स्थळाच्या ठिकाणी स्वच्छता, नदी किनारे ओढे नाले स्वच्छता करणे,घरगंती स्तरावरील सांडपाणी जाणीव जागृती करणे ,वृक्षलागवड,लोकसहभागातून प्लास्टिक संकलन,गाव स्तरावर स्वच्छता शपथ इत्यादी उपक्रम राबविण्यात येत आहेत आज १ आक्टोबर रोजी एक साथ एक तास श्रमदानासाठी आपण एकत्रित आलो आहोत. स्वच्छता ही काळाची गरज आहे प्रत्येकाने आपले घर परिसर व स्वच्छ ठेवले पाहिजे स्वच्छता विषयक शासनाच्या मार्गदर्शक सुचनेचे सर्वानी पालन केले पाहिजे.अस्वच्छतेमुळे पर्यावरणावर व मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे याची प्रत्येकाने जाणीव ठेऊन जिवन जगले पाहिजे यासाठी सर्वानी स्वच्छता मोहीम श्रमदानामध्ये मनापासुन सहभाग घेतला पाहिजे तरच आपले गाव स्वच्छ सुंदर होईल आदी माहिती गट विकास अधिकारी श्री आप्पासाहेब सरगर दिली या अभियान अंतर्गत मौजे ग्रामपंचायत रामपुर येथे किल्ला परिसर व गावभाग येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली "सर्वानी स्वच्छता विषयक शपथ ही घेतली" यावेळी पंचायत समिती जतचे गट विकास अधिकारी श्री आप्पासाहेब सरगर यांचेसह गट शिक्षण अधिकारी अन्सार शेख, विस्तार अधिकारी तुळशीराम संकपाळ,लोकमान्य कुंभार,एस बी शिंदे,एल टी गवारी यांचेसह बिआर सी टिमचे अधिकारी आय टी आय काॅलेजचे प्राचार्य श्री पवार सर व प्राध्यापक स्टाफ , विध्यार्थी गण,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक चाबरे सर, मोरे सर,पोलिस पाटील निकम,ग्रामसेवक डी एम साळे यांचेसह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य,अंगणवाडी सेविका,बचत गट स्वयंसेविका,ग्रामस्थ यांनी उत्फुर्त सहभाग घेऊन गावाची स्वच्छता केली.आय टी आय काँलेजचे विध्यार्थी यांनी स्वच्छता श्रमदान मोहिमेत सहभाग घेतले बद्दल त्यांना पंचायत समिती मार्फत प्रशस्तीपत्र देणार असलेले गट विकास अधिकारी यांनी सांगितले रामपुर गावचे सरपंच मारुती पवार यांनी स्वच्छता विषयक श्रमदान मोहिमेत सहभागी झाले बद्दल सर्वाचे आभार मानले.
Comments
Post a Comment