ईश्वराच्या प्रति समर्पित मनुष्यच मानवतेची यथार्थ सेवा करु शकतो- निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज,भक्तिभावनेचा कुंभमेळा - 76 वां निरंकारी सन्त समागम मुंबईसह महाराष्ट्रातून दोन लाख भक्तगण सहभागी.
दिव्यराज न्युज नेटवर्क (राजू ऐवळे) :- 29 ऑक्टोबर, 2023ः ‘‘ईश्वराच्या प्रति समर्पित मनुष्यच मानवतेची यथार्थ सेवा करु शकतो आणि एक सच्चा मानव बनून अवघ्या विश्वासाठी कल्याणकारी जीवन जगू शकतो.’’ असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी 76व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या प्रथम दिनी सायंकाळी सत्संगाच्या मुख्य सत्रामध्ये उपस्थित विशाल मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले.
तीन दिवसीय निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ काल 28 ऑक्टोबर, 2023 रोजी निरंकारी आध्यात्मिक स्थल, समालखा येथे झाला असून त्यामध्ये देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने विशाल जनसागर लोटला आहे. मुंबई व महाराष्ट्ातून सुमारे 2 लाख भक्तगण या समागमामध्ये सहभागी झाले आहेत तसेच एकट्या महाराष्ट्रातून सुमारे 20 हजार सेवादल स्वयंसेवकांनी समागमाच्या सेवांमध्ये भाग घेतला आहे. समाजाच्या विभिन्न वर्गातील व जगभरातील लोकांनी यामध्ये भाग घेतला असल्याने हा संत समागम अनेकतेत एकता व वसुधैव कुटुंबकमचे अनुपम दृश्य बनला आहे.
सद्गुरु माताजींनी पुढे प्रतिपादन केले, की सेवा वं समर्पणाची भावना अंगीकारल्यानेच जीवनात शांतीसुखाचा अनुभव येऊ शकतो. जगामध्ये मनुष्य जेव्हा एखाद्या व्यवसाय इत्यादिशी जोडलेला असून तर त्याठिकाणी त्याचे जे समर्पण असते ते भयापोटी किंवा अन्य कारणामुळे असू शकते ज्यामुळे शांती प्राप्त होऊ शकत नाही. भक्ताच्या जीवनात वास्तविक समर्पण प्रेमभावाने स्वतःला ईश्वराच्या प्रति समर्पित केल्यानेच येऊ शकतो. खरं तर असे समर्पणच मुबारक होय.
सद्गुरु माताजी ही बाब अधिक स्पष्ट करताना म्हटले, की एखादी वस्तु, मान-प्रतिष्ठा किंवा उपाधिच्या प्रति जर आपली आसक्ती जोडली़ असेल तर आपल्या अंतर्मनात समर्पण भाव उत्पन्न होऊ शकत नाही. परमात्माशी नाते जोडल्यानंतरच आत्म्याला आपल्या निजस्वरूपाचा बोध होतो ज्यामुळे तो केवळ भौतिक वस्तूच नव्हे तर आपल्या शरीराच्या प्रतिदेखील अनासक्त भाव धारण करु लागतो.
शेवटी सद्गुरु माताजींनी सांगितले, की जेव्हा आपण या कायम-दायम निराकार प्रभूची ओळख करुन प्रेमभावनेने युक्त होऊन या परमात्म्याची निरंतर आठवण ठेवू त्यावेळी आपल्या जीवनात सुख, शांती, समाधान आपसूकच नांदू लागते.
सेवादल रैली:
समागमाच्या दुसÚया दिवसाचा प्रारंभ एका आकर्षक सेवादल रैलीने झाला. या रॅलीमध्ये भारतभरातून व विदेशातूनही हजारोंच्या संख्येने निरंकारी सेवादलाचे बंधु-भगिनी सहभागी झाले. भारतातील पुरुष स्वयंसेवकांनी खाकी तर महिलांनी निळी-श्वेत वर्दी परिधान केली होती तर विदेशातील सेवादल बंधु-भगिनींसाठी निर्धारित केलेली वर्दी त्यांनी परिधान केली होती.
दिव्य युगुलाच्या पावन सान्निध्यात आयोजित या सेवादल रॅलीमध्ये सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी शांतीचे प्रतीक असलेला मिशनचा श्वेत ध्वज फडकवला.
या रॅलीमध्ये सेवादल स्वयंसेवकांकडून शारीरिक कवायतीचे प्रदर्शन करण्यात आले आणि मिशनच्या शिकवणूकीवर आधारित लघुनाटिकांच्या माध्यमातून सेवेच्या विविध पैलुंवर फारच रोचक पद्धतीने प्रकाश टाकला. या व्यतिरिक्त मानवी मनोरे इत्यादि विविध धाडसी खेळ सादर केले. तसेच विविध खेळांच्या माध्यमातून सेवेचे महत्व तसेच सेवेमध्ये बाळगण्याची सजगता इत्यादिचे प्रदर्शन केले. शेवटी, बॅण्डच्या तालावर सेवादल सदस्यांनी सद्गुरु माताजींच्या समोरुन मार्च पास्टच्या माध्यमातून सद्गुरु प्रणाम करुन आपल्या हृदयसम्राट सद्गुरुंच्या प्रति आदर-सन्मान व्यक्त केला.
सेवादल रैलीला संबोधित करताना सद्गुरु माताजी म्हणाल्या, की समर्पित भावनेने केली जाणारी सेवाच स्वीकार्य असते. जिथे कुठेही सेवेची आवश्यकता असेल त्यानुसार सेवेचा भाव मनात ठेवून जेव्हा आपण सेवेमध्ये भाग घेतो तेव्हा ती सेवेची शुद्ध भावनाच महान सेवा गणली जाते. जर आपल्याला सातत्याने एकसारखी सेवा मिळत असेल तर ती केवळ एक औपचारिकता न समजता पूर्ण तन्मयतेने करायला हवी. कारण जेव्हा आपण सेवाभावनेने सेवा करु तेव्हा ती कोणत्या ठिकाणी आहे याचे महत्व उरत नाही. जेव्हा आपण अशा प्रकारे सेवा करतो तेव्हा त्यामध्ये निश्चितच मानव कल्याणाचा भाव निहित असतो.
Comments
Post a Comment