पंचायत समिती जत येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत :-  आज पंचायत समिती जत येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणेत आली.या कार्यक्रमाप्रसंगी गटशिक्षणाधिकारी मा.अनसर शेख साहेब यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.व लालबहादूर शास्त्री यांचे प्रतिमेस विस्तार अधिकारी मा शिंदे साहेब यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व उपस्थित सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या या कार्यक्रमाप्रसंगी गटशिक्षणाधिकारी अनसर शेख साहेब यांनी मनोगत व्यक्त केले,या कार्यक्रमाप्रसंगी स्वच्छतेची शपथ स्वच्छ भारत अभियान चे मा.संतोष साळे साहेब यांनी दिली.या या कार्यक्रमाप्रसंगी विस्तार अधिकारी मा तुळशीदास संकपाळ, सभापती पी.ए.मायापा कांबळे, रफिक इंडीकर, सुनील लिमकर, कृष्णा गुरव,सौ.सुनिता सावंत, कणसे आणा, संकपाळ आणा, सुनील सरगर, मिलिंद देशपांडे, विष्णू कांबळे,तमा माळी इ बहुतांश अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्थाविक व सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन काष्ट्राईब कर्मचारी महासंघाचे सांगली जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष मा आर डी कांबळे साहेब यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन