वंचित बहुजन आघाडीची सांगली येथे सत्ता संपादन निर्धार सभा - अमोल भैया साबळे.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सत्ता संपादन निर्धार महासभा बुधवार दिनांक 29 11 2023 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम सांगली येथे दुपारी ठीक दोन वाजता होणार असल्याची माहिती जत तालुका अध्यक्ष अमोल भैया साबळे यांनी दिली. ते पुढे म्हणाले घराणेशाहीचे हुकूमशाहीचे सरकार हे कित्येक वर्षापासून सत्तेतत तळ ठोकून बसले असून यांनी मराठा, धनगर, मुस्लिम समाजाने गेली कित्येक वर्ष आरक्षणासाठी आंदोलने करूनही हे सरकार सत्तेत असूनही आरक्षण मिळू दिलेले नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरून यांची फक्त मते घेतली जातात. शेतकरी हा देशाचा पोशिंदा तरीही योग्य तो हमीभाव या सरकारने कधी दिला नाही शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा कित्येक दिवस प्रलंबित ठेवलेला आहे. आंबेडकर साहेबांनी NRC च्या विरोधात मोठा लढा उभा केला कंत्राटी नोकर भरती ला विरोध केला युवकांचा सरकारी नोकरी वरचा विश्वास त्यांचं मनोधर्य हे उंचाविल अशी भूमिका मांडली. गायरान जमिनीचां मार्ग बहुजनासाठी खुला केला. अशा अनेक विविध विषयावरती साहेबांचे मार्गदर्शन हे होणार आहे तरी या निर्धार सभेकडे पूर्ण राज्याचे लक्ष हे लागून राहिले आहे तरी या सभेचे भागीदार होण्यासाठी जत तालुक्यातील शेतकरी मित्र बहुजनसमाज माता भगिनी आंबेडकर प्रेमी संविधान प्रेमी सर्व सुज्ञ नागरिक यांनी हजारोंच्या संख्येने या सभेचे साक्षीदार बना असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल भैया साबळे व पदाधिकारी यांनी केले. या सभेसाठी प्रमुख मार्गदर्शन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे सर, क्रांती सावंत मॅडम प्रभारी अध्यक्ष संतोष सूर्यवंशी साहेब, जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, राजेश गायगवाळे, इंद्रजीत घाटे, जिल्हा महासचिव राजू मुल्ला आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Comments
Post a Comment