संखमधील बाबा आश्रममध्ये गुडडापूरला निघालेल्या भक्तांसाठी मोफत राहण्याची सोय व अन्नदान सुरू, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचा उपक्रम- तुकाराम बाबांचा पुढाकार.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- महाराष्ट्रसह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जत तालुक्यातील गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवीच्या कार्तिकी यात्रेला सुरुवात झाली आहे. प्रतिवर्षांप्रमाणे याही वर्षी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने पायी चालत निघालेल्या भाविकांच्या राहण्याची व त्यांच्या जेवणाची सोय संख येथील बाबा आश्रम येथे करण्यात आली आहे. हभप तुकाराम बाबा व श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेने अविरतपणे सुरु ठेवलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मागील दोन दिवसापासून हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला आहे.

जतची श्री यलम्मा देवी व गुडडापुरची श्री दानम्मा देवीची यात्रा प्रसिद्ध आहे. पाच ते आठ लाख भाविक यात्रेच्या काळात दर्शनासाठी येतात. सध्या श्री. दानम्मा देवीची यात्रा सुरू आहे. देवीच्या या कार्तिकी यात्रेला पायी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. देवींच्या या भाविकांची सोय व्हावी यासाठी तुकाराम बाबा यांनी बाबा आश्रममध्ये त्यांच्या राहण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची, नाष्टयाची सोय तसेच जेवणाची सोय केली जाते. कोरोनाच्या कठीण काळात हभप तुकाराम बाबा यांनी श्री दानम्मा देवीच्या यात्रा काळात कोरोनाच्या वेळी २० हजाराहून अधिक मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले होते. सलग तिसऱ्या वर्षी त्यांनी ही मदत सुरूच ठेवली होती. कोरोनाचा धोका अजूनही टळलेले नाही. कोरोना नवे ओमायक्रॉन रूप घेवून पुन्हा चंचू प्रवेश करू पाहत आहे. त्यात महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गुडडापूर येथील  श्री दानम्मा देवी यात्रा सुरू झाली आहे. कर्नाटकातून लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येत आहेत. कोरोना गेला अशीच मानसिकता लोकांची असल्याने लोकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर बंद केल्याचे बाबांच्या लक्षात येताच बाबांनी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने यात्रेकडे जाणारी वाहने थांबवून तसेच यात्रेत मास्क, सॅनिटायझर, पाण्याच्या बॉटलचे वाटप केले होते.
   दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाविकांची सेवा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. पायी जाणाऱ्या   हाविकांची गैरसोय होवू नये यासाठी तुकाराम बाबा अहोरात्र झटत आहेत. मागील दोन दिवसांपासून अन्नदान सुरू आहे.
■ अन्नदानात एक वेगळाच आनंद मिळतो-
दानात सर्वश्रेष्ठ दान अन्नदान आहे. अन्नदान केल्याने मनाला जे समाधान मिळते ते कोटी रुपये खर्च करूनही मिळत नाहीत. भुकेल्याला अन्न, तहानलेल्यांना पाणी द्या हीच शिकवण राष्ट्रीय  श्री संत गाडगेबाबा, वैराग्य संपन्न श्री संत बागडेबाबा यांनी दिली. त्याचेच आचरण आम्ही करत आहोत. चिक्कलगी भुयार येथे दररोज अन्नदान केले जाते. श्री दानम्मा देवीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांसाठीही दोन दिवसापासून चहा, पाण्याच्या बाटल्या, नास्टा व जेवणाची व्यवस्था केली आहे. यात्रा संपेपर्यत हा उपक्रम सुरूच राहणार असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन