संत निरंकारी मिशनच्या वतीने जत व सांगली येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.
दिव्यराज न्युज नेटवर्क सांगली- : (राजू ऐवळे) संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने शनिवार, दि.२३ डिसेंबर रोजी जत येथील बचत भवन जत येथे तर दिनांक २४ डिसेंबर रोजी संत निरंकारी सत्संग भवन, कोल्हापूर रोड, सांगली येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही शिबिरांची वेळ सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० अशी आहे.
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन मार्गदर्शनाखाली मानवाच्या आत्मिक कल्याणासाठी विश्वभर आध्यात्मिक जनजाग़तीचे कार्य केले जात असून कोणत्याही भेदभावाविना सर्वांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. त्यापैकी मोफत आरोग्य तपासणी शिबिर हा एक महत्वपूर्ण उपक्रम आहे.
या दोन्ही मोफत आरोग्य शिबिरांमध्ये संबंधित विषयांच्या तज्ञ डॉक्टरांचे पथक सामान्य आरोग्य तपासणी, मधुमेह तपासणी, ईसीजी इत्यादी द्वारे गरजू नागरीकांची आरोग्य तपासणी करणार असून त्यानुसार रुग्णांना आवश्यक ते औषधोपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन करतील. या व्यतिरिक्त ॲक्युप्रेशर पद्धतीचे उपचारही या शिबिरामध्ये उपलब्ध केले जाणार आहेत.
Comments
Post a Comment