संत निरंकारी मंडळाच्या आरोग्य शिबिरास जत मध्ये उत्फुर्त प्रतिसाद.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत :-(राजू ऐवळे) संत निरंकारी मंडळ चॅरिटेबल फौंडेशन रजि दिल्ली शाखा जत येथे आयोजित मोफत मेडिकल तपासणी शिबिर मध्ये विविध आजाराच्या सुमारे ५००  रुग्णानी सहभाग घेऊन आपले आरोग्य तपासणी उपचार घेतला. 
      बचत भवन जत येथील आयोजित कँम्पचे उद्घाटन डॉ पुरुषोत्तम अरोराजी ह्रदयरोग्य तज्ञ हुबळी यांचे हस्ते झाले. त्याचे प्रमुख मार्गदर्शनाखाली डॉ तुकाराम खोत आयुर्वेदिक तज्ञ कोल्हापूर डॉ पांडुरंग नाकार्डे जनरल फिजिशन कोल्हापूर डॉ विष्णु मस्कर जनरल फिजिशन कोल्हापूर डॉ सुरेश पोवार अँक्युप्रेशर तज्ञ कोल्हापूर डॉ दिगंबर वाघमोडे अँक्युप्रेशर तज्ञ सोलापूर डॉ अंकिता केणी Phd जे जे हाँस्पिटल मुंबई, डॉ अभय मोगले अँक्युप्रेशर तज्ञ जत डॉ निलेश ननवरे आणी डॉ अश्विनी ननवरे त्वचारोग तज्ञ जत इत्यादी तज्ञ डॉक्टरानी" मानव को मानव हो प्यारा एक दुजे का बने सहारा" या निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचे वचनानुसार रुग्णाची तपासणी करून मोफत औषधाचेही वाटप केले त्याचेबरोबर मुबंई, कोल्हापूर येथुन फार्मासिस्ट व नर्सिंग स्टफ यांनीही मानवतेच्या सेवेत सहभाग घेतला. 
 यावेळी बोलताना डॉ पुरुषोत्तम अरोराजी ह्रदयरोग्य तज्ञ हुबळी म्हणाले की मानवाने आपल्या आहाराकडेही लक्ष दिले पाहिजे तेलकट,अंबट,तिकट मसालेदार पदार्थ याचा वापर कमीत कमी केला पाहिजे शारीरिक व्यायाम ही दररोज केला पाहिजे दिवसातुन ३ ते ४ लिटर पाणी सेवन करणे आवश्यक आहे.याचेबरोबर शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहणेसाठी आध्यात्मिक सत्संगाचा आधार घेणे गरजेचे आहे  संत निरंकारी मंडळ हे खऱ्या अर्थाने एका प्रभु परमेश्वराची ओळख करून देऊन सर्वामध्ये ईश्वराचा वास आहे विश्वाची निर्मिती करणारा प्रभु परमात्मा एक आहे म्हणून आपण सर्व मानव एक आहोत निरंकारी मंडळ हे मानवामध्ये असलेल्या खऱ्या मानवतेची जाणिव करून देते मानव सेवा हिच ईश्वराची सेवा आहे या निरंकारी सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या शिकवणी नुसार आम्ही सेवा करत आहोत" दवा के साथ दुवा की जरुरत होती है याचा अनुभव संत निरंकारी भाविक भक्त घेत आहेत.     या कार्यक्रमास जतचे गट विकास अधिकारी श्री ए आर सरगर यांचे मोलाचे सहकार्य लाभले सुत्रसंचालन संजय साळुंखे यांनी केले नियोजन जत ब्रँच मुखी जोतिबा गोरे,सेवादल संचालक संभाजी साळे यांचे मार्गदर्शन खाली सेवादल संत महापुरुष यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन