चैतन्य इंडिया फिन क्रिडिट कंपनीचे कार्य कौतुकास्पद-तुकाराम बाबा महाराज, संखमध्ये मुलांसाठी वॉटर फिल्टर दिले भेट.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- दुष्काळी जत तालुका पाण्यासाठी कायम संघर्ष करत आला आहे. जतच्या जनतेला पाण्याचे महत्व चांगलेच माहीत आहे. पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या तालुक्यातील मुलांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी चैतन्य इंडिया फिन क्रिडिट कंपनीने मुलांसाठी वॉटर फिल्टर बसविले आहे. कंपनीचे कार्य कौतुकास्पद असून त्यांचा आदर्श अन्य सामाजिक संस्थेनी घ्यावा असे आवाहन चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांनी केले.


जत तालुक्यातील संख येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथे चैतन्य इंडिया फिन क्रिडिट प्रा. लिमिटेड कंपनीच्या वतीने खास मुलांसाठी वॉटर फिल्टर देण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हभप तुकाराम बाबा महाराज बोलत होते. यावेळी कंपनीचे जत युनिटचे युनिटचे व्यवस्थापक अनंद पनचमाळे, कवठेमहाकाळ युनिटचे व्यवस्थापक अमित मोरे, शाखा व्यवस्थापक अण्णासो सावंत, शिवाजी वाघमोडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुमार बिराजदार यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आपणास पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे हे आमचे दुर्दैव आहे यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करत चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांनी जत पूर्व भागातील जी वंचित ६५ गावे आहेत त्या प्रत्येक गावात म्हैसाळचे पाणी मिळालेच पाहिजे. म्हैसाळच्या पाण्यासाठी जनरेटयांची गरज असून जत पूर्व भागात त्यासाठी तीव्र आंदोलन उभारणे काळाची गरज आहे.
शासन, प्रशासनाने पाण्यासाठी जतकरांची कशी चेष्टा लावली आहे हे उदाहरणासह बाबाबनी सांगितले. वर्षानुवर्षे पाणी देणारच असे आम्हाला सांगण्यात येत होते पण प्रत्यक्षात ज्यावेळी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून आम्ही संख ते मुंबई पायी दिंडी काढली त्यावेळी आम्हास थेट लेखी देण्यात आले की जतला द्यायला पाणीच शिल्लक नाही. ऐतिहासिक पायी दिंडी नंतर जतकरांना आमच्या आंदोलनानंतर कळले की पाणीच शिल्लक नाही, पाणीच शिल्लक नव्हते ही वस्तुस्थिती असताना आम्हास पाणी देण्याचे आश्वासने देण्यात आली हे जनतेने लक्षात घ्यावे. पाण्यासाठी श्रेयवाद नको तर पाणी आले पाहिजे यासाठी सर्वांनी एकसंघ लढा दिला पाहिजे. पाण्याच्या या लढ्यात आपण श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून कार्यरत असून आपणही सहकार्य करावे असे आवाहन केले.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन