म्हैसाळचे हक्काचे पाणी तालुक्यातील ६४ गावांना मिळण्यासाठी आठ जानेवारीपासून अंकलगी ग्रामस्थांसह आंदोलनात उतरणार- तुकाराम बाबा महाराज.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत :-२०२४ साल उजाडेल तरी अद्याप म्हैसाळचे हक्काचे पाणी जत तालुक्यातील ६४ गावांना मिळालेले नाही. या गावांना हक्काचे म्हैसाळचे पाणी मिळालेच पाहिजे यासाठी येत्या आठ जानेवारीपासून अंकलगी ग्रामस्थांसह आपण आंदोलनात उतरणार आहोत. त्यानंतर ६४ गावात पाण्यासाठी पाण्याचा कळस घेवून जनजागृती मोहीम व आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.जत पूर्व भागातील पाण्यासाठी तीव्र लढा उभारणार असल्याचे चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिले.
   तुकाराम बाबांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बाबांनी जत तालुक्यातील शेवटीच्या गावांना अद्याप पाण्यासाठी लढा उभा करावा लागतो ही बाब दुर्देवी असल्याचे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी मानव मित्र संघटनेचे माहांतेश स्वामी, सलीम अफराद, पिंटू मोरे , रावसाहेब करजगी उपस्थित होते.यावेळी बोलताना तुकाराम बाबा यांनी जत तालुक्यात सध्या सुरू असलेल्या पाणी पूजनाचा खरपूस समाचार घेतला.
२०१२ साली जत तालुक्यात दाखल झालेले पाणी २०२४ उजाडले तरी आम्हाला मिळालेले नाही. याउलट २०१९ मध्ये जत ओलांडून मंगळवेढा तालुक्यात तबबल २० वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पाणी पोहचू शकते. जे पाणी मंगळवेढयाला पोहचले ते पाणी जत पूर्व  भागात का पोहचले नाही असा सवाल उपस्थित करत तुकाराम बाबा म्हणाले २०१९ साली तालुक्यातील माडग्याळ येथील लिंबाजी माळी, सलीम अफराद, जेटनिंग कोरे, कामण्णा बंडगर, दशरथ सुतार यांच्यासह अंकलगी येथील ग्रामस्थाना घेवून पाण्यासाठी ऐतिहासिक संख ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी काढली. त्यावेळीचे तत्कालीन जलसंपदा मंत्री यांनी जतला देण्यास पाणीच शिल्लक नसल्याचे सांगितले. आपण काढलेल्या पायी दिंडीनंतर जतला देण्यास पाणीच शिल्लक नसल्याचे उघड झाले. जतला द्यायला पाणीच शिल्लक नव्हते तर मग २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अंकलगी येथे म्हैसाळ अधिकाऱ्यांनी विस्तारितचा नकाशा सादर करून दोन महिन्यात पाणी देऊ सांगितले इतकेच नव्हे तर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संख येथील जाहीर सभेत विस्तारित योजनेला तांत्रिक मान्यता दिल्याचे जाहीर केले. पाणीच शिल्लक नसताना अशा घोषणा का केल्या असा सवालही बाबांनी यावेळी उपस्थित केला.
   मायथळ येथे दाखल झालेले म्हैसाळचे पाणी कमी खर्चात माडग्याळ, संख, गुडडापूर,उमदी, दरीबडची, दरीकोनूर, सोर्डी येथे जावू शकते याचा खाजगी सर्व्हे आपण केला व त्यानंतर या भागात पाणी सोडावे अशी आग्रही भूमिका मांडत शासन, प्रशासन दरबारी हेलपाटे मारत मागणीचा पाठपुरावा करत असल्याचे सांगून बाबा म्हणाले, पायी दिंडी नंतर गुडडापुर येथे पाणी परिषद घेतली. त्यावेळी लोकसहभागातून ७० ते ७५ लाख देण्याची घोषणा अनेकांनी केली होती. श्रेयवादापेक्षा जतला पाणी आले पाहिजे ही आमची भूमिका आहे त्यानुसारच पुढील आंदोलनाची दिशा ठरवली आहे. आठ जानेवारी रोजी अंकलगी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला त्या आंदोलनाला आपला पाठिंबा असून त्यांच्यासमवेत आपण आंदोलनात उतरणार आहोत. पाण्याची ही जलचळवळ अधिक तीव्र करून ६४ गावात पाण्याचा कलश घेवून फिरणार असल्याचे सांगत आंदोलनाची दिशा आपण लवकरच जाहीर करणार असल्याचे बाबांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन