गुरु शिष्याचे आपुलकी नाते म्हणजेच जोशी सर, बी डि ओ सरगर यांची प्रतिक्रिया.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत (राजू ऐवळे) :- एके ठिकाणी म्हटले आहे की ज्याच्या जीवनामध्ये गुरु त्यांचे जिवन खऱ्या अर्थाने सुरू असेच एका गुरु शिष्याची भेट म्हणजे एका खेडेगावातील मुलगा तालुक्याच्या ठिकाणी हायस्कूल काँलेजला शिकायला जातो त्यांच्या सर्वगुणसंपन्न स्वभावामुळे तेथील प्राचार्य यांचा प्रिय विध्यार्थी बनतो मग तो पुढे शिक्षण घेऊन मोठा अधिकारी बनतो नंतर तो तालुक्याच्या ठिकाणी आल्यानंतर आपल्या गुरुला न विसरता आपुलकीने घरी जाऊन भेट घेऊन आशिर्वाद घेतो तब्येतीची विचारपूस करतो आणि गुरु देखील मोठ्या अभिमानाने पुर्वी प्रमाणे अलिंगण देऊन भेटतात तो विध्यार्थी आणि प्राचार्य म्हणजे पंचायत समिती जत येथे गट विकास अधिकारी पदी कार्यरत असणारे श्री आप्पासाहेब सरगर साहेब आणी जत हायस्कूल जतचे माझी प्राचार्य श्री श्रीपाद जोशी सर या दोघांमधील प्रेम हे एक अतुट न तुटणारे बंधन आहे दोघांमधील आपुलकीचे नाते इतके श्रेष्ठ आहे की इतरांना शिकण्यासारखे आहे आज मकरसंक्रांतीच्या सणावेळी श्री आप्पासाहेब सरगर यांनी जोशी सरांच्या घरी जाऊन तिळ गुळ शाल व पुष्पगुच्छ देऊन चरणस्पर्श करून आशिर्वाद घेतला आज पाहायला गेले तर मुलगा मोठा झाला की आपले आईवडील नातेवाईक गुरुजण यांना विसरतो आई वडीलांची सेवा करीत नाही आणी नको त्या गोष्टी करायला लागतो व जीवनातील आनंद हिरावुन बसतो गुरुजण आई वडील थोर मोठ्यांना प्रेमाणे बोलणे आनंदीत ठेवणे त्यांचेशी आपुलकीने वागणे हेच खरे जिवन आहे या विचारांचा वारसा आज आपल्याला जतचे गट विकास अधिकारी श्री आप्पासाहेब सरगर यांचे मध्ये पाहायला मिळतो हेच खरे जिवन आहे आणी हीच खरी शिकवण
Comments
Post a Comment