डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करा :- प्रा.प्रकाश नाईक.
दिव्याराज न्यूज नेटवर्क :- (राजू ऐवळे) सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ, सनमडी आणि श्री.उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन,जत यांच्या संयुक्त विद्यामाने दरवर्षी प्रमाणे "सिद्धार्थ फेस्टिवल "अंतर्गत राजर्षी छ. शाहू महाराज स्मृती व्याख्यानमाला घेण्यात आली.आज या व्याख्यानमालेला प्रा.प्रकाश बाळू नाईक हे लाभले होते. त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये सांगितले कि,सर्वांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करा.त्यांच्या संविधानाने देशात जी क्रांती केली आहे ते विसरून चालणार नाही.त्यांच्या चरित्रातून " शिका! संघटित व्हा! संघर्ष करा! " हे शिका तरच आपण समज्यात वावरू शकाल असे मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ. सौ. वैशाली सनमडीकर आणि संस्थेचे सचिव डॉ.कैलास सनमडीकर उपस्थित होते.
Comments
Post a Comment