घरकुल योजनेमध्ये उत्कृष्ट कामकाज केलेबद्दल जतचे गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांचा पुणे विभागाचे उपायुक्त विजय मुळीक यांचे हस्ते सत्कार.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत प्रतिनिधी :- प्रधानमंत्री आवास योजना,मोदी आवास योजना,रमाई आवास योजना अंतर्गत उत्कृष्ट कामकाज केलेबद्दल पंचायत समिती जतचे गटविकास अधिकारी श्री आप्पासो सरगर साहेब यांचा सत्कार पुणे उपायुक्त श्री मुळीक साहेब यांचे हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ तृप्ती धोडमिसे मँडम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री निखिल ओसवाल,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग श्री शशिकांत शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन प्रमोद काळे, पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री सायमोते साहेब तसेच जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.पदभार घेतल्यापासून श्री सरगर यांनी प्रधानमंत्री आवास घरकुल अंतर्गत एकुण ९०१३ एवढी घरकुले मंजूर असुन त्यापैकी ७४७५ इतके घरकुल पुर्ण झालेली असुन सुरू नसलेल्या ७६० घरकुल लाभार्थी यांचे मालमत्तेवर बोजा चढवण्यात आलेला आहे तसेच ४५० सुरू नसलेल्या लाभार्थी यांचे अनुदान रक्कम शासन खाती वर्ग करण्यात आली आहे तसेच मोदी अवास योजने अंतर्गत तालुक्याला प्राप्त ५२०उद्दिष्टे पैकी५२० लाभार्थी यांना लाभ देऊन १०० टक्के कामकाज करुन जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला त्यांच्या या कामाबद्दल आज पुणे विभागाचे उपायुक्त यांनी कौतुक करुन विस्ताराने मोठा व दुष्काळग्रस्त तालुक्यात अतिशय चांगले कामकाज केलेबद्दल समाधान व्यक्त केले व सत्कार केला.यावेळी श्री सरगर म्हणाले की जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ धोडमिसे मँडम तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री निखिल ओसवाल साहेब यांचे मार्गदर्शन तसेच पंचायत समिती जत कडील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व पंचायत समितीचे सर्व कर्मचारी वर्ग यांनी केलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे हा सत्कार माझा नसुन माझे सर्व कर्मचारी बांधवांचा असलेचे गट विकास अधिकारी श्री आप्पासाहेब सरगर यांनी सांगितले. जिल्हा परिषद सांगली येथील आढाव्यावेळी जत तालुक्याचा गौरव
Comments
Post a Comment