कै राजकुमार कोळी यांचे आज दि २२/०२/२०२४ रोजी अल्पशा आजाराने सांगली येथे निधन.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- मूळ अंकले गावचे असणारे राजू कोळी हे अध्यात्मिक वृत्तीचे वारकरी संप्रदायात रमणारे होते. श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल मध्ये शिपाई म्हणून आपली सेवा त्यांनी निष्ठेने निभावली. 
प्रशालेतील मारूती मंदिराची सेवा ते मनापासून करायचे. ड्रायविंग कला चांगली अवगत असल्याने प्रशालेच्या प्रशासकीय व इतर कामात त्यांची मदत ठरलेली असायची.
मोठ्या भावाच्या निधनानंतर त्यांनी कुटुंबियांना सावरत त्यांनी कुंटूबप्रमुखाची जबाबदारी पार पाडली. 
जत येथे कार्यरत असताना अंकले गावची नाळ त्यांनी कधीही तुटू दिली नाही. अंकले गावच्या हायस्कूलच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनां त्यांनी एकत्रित करण्याचे काम केले.
पहाटेच्या वेळी प्रशालेत भक्ती गीतांची मैफल माईकवरून लावणारे राजू कोळी यांचे अकाली निधन धक्कादायक आहेच व श्री रामराव विद्यामंदिराच्या परिवाराला मनाला चटका लावणारे देखील!!
कै राजकुमार कोळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन