नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी गटतट विसरून एक व्हा- भाजपा निवडणूक प्रमुख तमन्नगौडा रवीपाटील.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी जत तालुक्यातील महायुतीचे सर्व नेते कार्यकर्ते गट तट बाजूला ठेवून सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवा असे आव्हान भाजपचे जत विधानसभा  निवडणूक प्रमुख तमन्नगौडा रवी पाटील यांनी केले. भाजप व घटक पक्षाचे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक जत येतील भाजपचे वारू मध्ये आज संपन्न्न झाली तेव्हा रवी पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्यावर जत विधानसभा निवडणूक प्रमुखाची जबाबदारी सोपवली  आहे मी पक्षाचा निष्ठावान व कट्टर कार्यकर्ता आहे भाजप पक्षासाठी मी सर्व काही मानपान सोडून एक पाऊल मागे घेण्यासाठी तयार आहे. भाजपमध्ये  माझ्यापेक्षा अनेक ज्येष्ठ नेते तालुक्यात आहेत माजी आमदार विलासराव जगताप व डॉक्टर रवींद्र आरळी यांच्याशी चर्चा करूनच मी बैठक घेतली आहे पक्षातील ज्येष्ठ नेत्याबद्दल मला पूर्ण आदर  आहे. सध्याची लढाई ही  पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याची आहे त्यासाठी संजय काका पाटील यांना पुन्हा खासदार करण्याचे शपथ घेऊया, 2019 पेक्षा 2024 मध्ये संजय काका अधिक मताने निवडून येतील असे तमन्नागौडा रवी पाटील म्हणाले.                                     या बैठकीस सुभाष गोब्बी, प्रसिद्ध उद्योगपती विजयकुमार  चिपलकट्टी, मार्केट कमिटीचे माजी संचालक विठ्ठल निकम, निवृत्ती शिंदे, नगरसेवक टिमू एडके, प्रमोद हिरवे, सरपंच परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष बसवराज पाटील, चर्मकार महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष किरण शिंदे, आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे, तालुकाध्यक्ष संजय कांबळे- पाटील, प्रहार संघटनेचे सुनील बागडे, भाजपा युवा मोर्चाचे विजयकुमार पाटील, जिल्हा सरचिटणीस कामांना बंडगर, भटके विमुक्त जाती जिल्हाध्यक्ष हनुमंत गडदे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावतराय तेली, रमेश देवरषी, उमरणीचे सरपंच विजयकुमार नामद, रामलिंग निवर्गी, मिरासाहेब मुजावर, वाळेखिंडीचे सरपंच सौ.वसुधा महादेव हिंगमिरे, महादेव हादीमनी, सोमनिंग  चौधरी, याच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते,

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन