टँकरचे पाणी प्रशासनातील अधिकाऱ्यांनो पिऊन दाखवा - तुकाराम बाबांचे आवहांन.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- जत तालुका दुष्काळात होरपळत असताना राजकीय मंडळी राजकारणात गुंग आहेत तर प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवित आहे. तालुक्यात टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे ते पाणी पिण्यायोग्य नाही. जतला टँकरने दूषित पाणी पुरवठा केला जात असल्याचा आरोप करत या टँकरचे पाणी प्रशासनातील प्रांताधिकारी, तहसिलदार किंवा अन्य अधिकाऱ्यांनी पिऊन दाखवावे असे जाहीर आव्हान चिक्कलगी भुयार मठाचे मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी दिले आहे.
हभप तुकाराम बाबा महाराज यांनी तालुक्यातील ज्या गावात टँकर सुरू आहेत त्या गावांना भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी तुकाराम बाबा यांच्यापुढे आपल्या व्यथा मांडल्या. ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला.
     दुष्काळी भागाचा दौरा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना हभप तुकाराम बाबा म्हणाले, २०१८ मध्ये भयावह दुष्काळ पडला होता त्यावेळी १२० हुन अधिक टँकरने जतकरांना पाणी पुरवठा करण्यात आला. मागील वर्षी पावसाने दडी मारल्याने यंदा जतकरांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. मागील महिन्याभरापासून ६५ टँकरने गावोगावी टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. माणसी २० लि. हे गणित मांडून प्रशासनाकडून पाणी पुरवठा केला जात आहे. जो पाणी पुरवठा केला जात आहे ते पूर्णतः चुकीच्या पध्दतीने सुरू आहे. टँकरवर कोणाचेच नियंत्रण नाही, टँकरमध्ये जे पाणी आहे ते दुषित आहे. त्यामध्ये टीसीएल टाकले जात नाही, गळके टँकरही आहे. एकाच  टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याने ग्रामस्थांना विशेषतः महिलांना टॅंकरची वाट पाहत बसण्यापेक्षा पर्याय नाही. प्रशासन व नेते मंडळी निवडणूक मध्ये गुंतले असल्यामुळे  कोणी लक्ष देण्यास तयार नसल्याची खंत तुकाराम बाबा यांनी  दिव्यराजशी बोलताना व्यक्त केली.
 टँकरने होणारा पाणी पुरवठा सुरळीत करा, माणसी ५० लि. पाणी देवून गावोगावी टँकरच्या खेपा वाढवा. तसेच तालुक्यातील तलावाने तळ गाठल्याने जनावरांसाठीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जनावरांच्या पाण्याबाबत कोणतेही ठोस नियोजन करा . जनावरांना चारा व पाणी देण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा अन्यथा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने तालुक्यात आंदोलन करण्याचा इशारा हभप तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

13 मे हा दिवस संत निरंकारी मिशनच्या वतीने जगभर “समर्पण दिवस” म्हणून साजरा केला जातो.

जत येथील सोहन ठोंबरे यांना डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची पीएच. डी.