विठू गजरात, तुकाराम बाबांच्या उपस्थितीत पायी दिंडी पंढरपूरकडे रवाना.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत प्रतिनिधी:- विठ्ठल नामाच्या गजरात चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या उपस्थितीत चैत्रवारीत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चिक्कलगी भुयार ते पंढरपूर पायी दिंडी पंढरपूरकडे रवाना झाला आहे. या दिंडीत १५ लाखाचा सागवानी रथ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
राष्ट्रीय संत गाडगेबाबा, वैराग्यसंपन्न श्री संत बागडेबाबा यांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजकार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे तुकाराम बाबा महाराज यांनी २०१७ मध्ये चैत्र वारीला पायी दिंडी सुरु केली. मागील वर्षी चैत्र वारी पायी दिंडीत पुढील वर्षी संपूर्ण सागवानी रथ तयार करण्याचा मानस भक्तांनी व्यक्त केला.   भक्तांचा हा संकल्प पूर्ण झाला असून पंढरपूर येथे १५ लाखाचा सागवानी रथ बनविण्यात आला आहे. बागडेबाबांच्या भक्तांनी दिलेल्या देणगीतून १५ लाखाचा भव्य रथ तयार करण्यात आला आहे. संपूर्ण सागवानी असलेला हा रथ अतिशय आकर्षक बनविण्यात आला आहे. रथावर घोडे, हत्ती अन्य कोरीव काम करण्यात आले आहे. पंढरपूर येथील भारत काळे यांनी हा रेखीव रथ तयार केला आहे.
गुढीपाडव्याला शुभदिनी आपण घरात वस्तू आणतो अगदी त्याचपद्धतीने पाडव्याला आपल्या गुरूंचा रथ आणण्याचा बागडेबाबांच्या भक्तांचा मानस होतो व तो मानस पूर्ण झाला. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रथ पंढरपूर येथून भुयार येथे आणण्यात आला. यावेळी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज, हभप अमृत पाटील जालिहाळ यांच्यासह नारायण चौगुले, दत्ता चौगुले , पिंटू कांबळे ,गुदळे सर , श्रीकांत पाटील, शिवराया हत्तळी, आप्पासो मलाबादी, प्रफुल्ल पटेल, सिद्धू उमराणी, श्रीशैल पुजारी, राजू चौगुले , प्रकाश तेली, आकाश घुले नंदू मेटकरी , बापू चौगुले, महेश भोसले, संतोष केळकर आदी बागडेबाबा भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.
यावर्षी हा रथ पायीदिंडीत सहभागी झाल्याने भक्तांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे. सोमवारी पहाटे  पायीदिंडीने चिक्कलगी भुयार येथून पंढरपूरकडे प्रयाण केले. मंगळवारी हभप अमृत पाटील जालिहाळ यांच्या निवासस्थानी दिंडीचा पहिला मुक्काम झाला. यावेळी उपसरपंच नवनाथ शामराव मिटकरी, वास्तुशास्त्र तज्ञ सरिता लिंगायत आदी भाविक पायीदिंडीत सहभागी झाले होते. दिंडीत  वाहन व्यवस्था जकाप्पा ढगे महाराज,  वाहन व्यवस्था निंबोणी रामलिंग मधाप्पा, मेडिकल ,पाणी व्यवस्था मारोळी प्रफुल  पाटील गुंजेगाव , ज्ञानोबा माळी निंबोणी , अमृत पाटील ,रामलीला  मेडेदार
आदी उपस्थित होते,

Comments

Popular posts from this blog

सांगली कृ.उ.बा.स. निवडणुकीत भाजपला मत मागण्याचा अधिकार नाही.भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष तथा सरपंच परिषद जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांचा भाजपला घरचा आहेर!

पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृतीची गरज: - डॉ. मधुकर बाचुलकर

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.